Ad will apear here
Next
रेगे, अहो सदानंद रेगे...


रेगे, अहो सदानंद रेगे,

आम्ही तुमची पुरेशी दखल घेतली नाही; कदर केली नाही आणि उचित सन्मान तर केलाच नाही. म. सु. पाटील, दिलीप चित्रे आम्हाला सांगत राहिले तुमच्या प्रतिभेबद्दल. आम्ही ऐकलेच नाही. त्या वसंत आबाजी डहाकेंनी थोडे समजावले आम्हाला; पण तरीही आम्ही इतकी वर्षे त्यांचेही ऐकलेच नाही.
आम्ही पश्चातापदग्ध आहोत. आमचे अभिवादन स्वीकार करा.

रेगे, अहो सदानंद रेगे,
आम्हाला क्षमा करा!

व्हॅन गॉव

मी
व्हॅन गॉव
मी
सूर्यफुलांच्या शय्येवर
निजलो एका वेश्येला घेऊन
अन् दिला तिला
माझाच एक कान कापून...
ई ऽ ऽ ऽ ऽ ऽ
अखेर हिरव्या सावल्यांच्या डोहांत
आत्महत्या केली मी
तिची ती
उन्हाची
पिवळीजर्द... विवस्त्र किंकाळी ऐकून

- सदानंद रेगे

ही आमची श्रद्धांजली तुम्हाला!

व्हॅन गॉव

तो रंगवायचा डोळे
कधी भिंतीवर
कधी छतावर
कधी खिडकी
कधी दारावर
त्याने आभाळावरसुद्धा
रंगविले डोळे
आणि, मरण्याआधी
त्याने शिकून घेतली कला
- हवेत डोळे रंगविण्याची!

हे डोळे मग बघायचे
सारा सभोवताल
सारे विश्व त्याच्या बाहेरचे
पण त्यानेच दिले होते
वरदान त्या डोळ्यांना
- त्याच्या त्वचेच्या आत बघता येण्याचेही!

त्वचेला सुरकुत्या पडण्याआधी
डोळ्यांच्या कडांना अश्रू लपण्याची सुरकुती पडण्याआधी
त्याच्या हवेतल्या डोळ्यांनी पाहिले
त्याचे अनादिकालापासून झिरपणारे
चेहऱ्याच्या खोबणीतले डोळे...
वेडाच तो!
मग त्याने कापून घेतला
स्वतःचा कान
आणि रंगविला
घराच्या खिडकीतून दिसणारा सूर्योदय...
(सहा वर्षे लागली त्याला सूर्योदय आकाळायला!)

- गणेश कनाटे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CWJYCR
Similar Posts
कवितेचे भाषांतर, अनुवाद, रूपांतर किंवा अनुसर्जन गेली काही वर्षे इतर भारतीय भाषांतून, तसेच जगातील इतर भाषांतून मराठी भाषेत भाषांतरित होऊन आलेल्या पुस्तकांची संख्या बऱ्यापैकी वाढलेली दिसते. कवितेतला माणूस असल्याने कवितेपुरते सांगायचे झाल्यास इतर भाषांतून मराठीत भाषांतरित होऊन आलेल्या कवितांच्या भाषांतराच्या दर्जाबद्दल माझ्या मनात एक कायम असमाधान असते
सदानंद रेगे मराठी कवितेचा आनंदरसास्वाद घेताना कवी सदानंद रेगे हे नाव राहून गेलं तर तसा फार मोठा फरक पडेल असं नाही. खुद्द रेगेंनाही तसा पडला नाही.
काळोखाला भेदणारा प्रकाश समोर असतोच... काळोखाला भेदणारा प्रकाश समोर असतोच... जर त्याच्याकडे पाहायची हिंमत असेल तरच... जर स्वत: प्रकाश होण्याची हिंमत असेल तरच... जो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्याच्या सोहळ्यात आमंडा गॉर्मन या २२ वर्षांच्या कवयित्रीनं The Hill We Climb ही अप्रतिम कविता सादर केली. त्यातल्या या शेवटच्या ओळी
मोहरीच्या दाण्याएवढया सद्गुणाची गोष्ट गेल्या दोन महिन्यांत संध्याकाळी एका विशिष्ट वेळी मी माझ्या खिडकीत उभा राहून बाहेर रस्त्याकडे बघत असे. सुरुवातीला ती वेळ संध्याकाळच्या माझ्या कॉफीनंतरची स्वतःला सतत मनाला वेढून टाकणाऱ्या नैराश्य भावनेला पिटाळून टाकण्याची वेळ म्हणून मी ठरवली होती; पण माझ्या असे लक्षात आले, की त्याच वेळी आमच्या शेजारच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language